पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील आडगाव येथे उसनवार दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर प्रकार असा की, सुरेश मकडू पाटील (वय ५०, रा.आडगाव) यांनी गावातील योगेश मुरलीधर पाटील याला उसनवारीने पैसे दिले होते. बुधवारी (दि.२) सकाळी सुरेश पाटील यांनी उसनवारीने दिलेले पैसे योगेश कडे परत मागितले होते. याचा राग आल्याने योगेशने कुऱ्हाडीच्या दांड्याने सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून योगेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करत आहे.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल