पैशाच्या बॅग लांबविणाऱ्या टोळीचा म्होरक्या एलसीबीच्या जाळ्यात, लाखोंची रोकड जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२४ । पारोळा शहरात बॅग चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या एलसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. बसंत बनवारीलाल शिसोदिया (वय ३० वर्षे रा. कढीयागाव ता. पचोर जि. राजगढ राज्य मध्यप्रदेश) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत असं की, दोन दिवसापुर्वी पारोळा शहरातील स्टेट बँक परीसरात बसंत शिसोदिया याने त्याच्या गावातील साथीदार रिशी सिंगदर सिसोदीया व विशाल ऊर्फे मोगली सिसोदीया (रा. गुलखोडी ता. पचोर जि. राजगढ) यांच्यासोबत पैशाची बॅग लांबविली होती. ही पुन्हा पैशाची बॅग चोरी करण्याच्या ईरादयाने पारोळा शहरात संशयीरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन एलसीबी पथकाने गोपनीय माहीतीवरुन पारोळा शहरातील धरणगाव माथाळा भागात एका संशीयत इसमास सापळा बसंत शिसोदिया याला ताब्यात घेतले.
यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३,१८,००० रुपयाची रोकड आढळून आली. याबाबत त्याला विचारले असता बसंत शिसोदिया याने सांगितले की ही रक्कम दोन दिवसापुर्वी पारोळा शहरातील स्टेट बैंक परीसरात त्याच्या गावातील साथीदारासह चोरी केलेली रक्कम आहेत. त्याने पैशाच्या बॅग चोरीचा म्होरक्या असल्याचे सांगून तो पारोळा शहरात पुन्हा एकदा चोरी करण्याकरीत आला असल्याचे सांगितले.
यापूर्वी त्याने पाचोरा, धरणगावसह इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या पैशाच्या बॅगा चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन त्याने पारोळा पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन व पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा केल्याचे कबुल केले. संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया यास पोराळा पोलीस स्टेशन येथे मुददेमालासाह पुढील गुन्हयाच्या तपासाकामी ताब्यात देण्यात आले आहे.