जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिर्डीला जात असल्याचे सांगून गावातील स्मशानभूमी गाठलं. या ठिकाणी शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन एका ३२ वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपविला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
शिरसोली येथील संजय हरी पाटील हे ट्रक चालक असून त्यांनी पत्नी व भावांना शिर्डी येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र शिर्डीला न जाता शिरसोली गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये ते आले.या ठिकाणी शर्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
ही बाब गावातील गोलू पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती पोलीस पाटील शरद पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मयत संजय हरी पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आई-वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.