ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी

नोव्हेंबर 26, 2021 4:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । धरणगाव रस्त्यावर एरंडोल कडून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक ने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली असता त्यात दुचाकीवरील एक इसम जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एरंडोल पासून एक किलोमीटर अंतरावर धरणगाव रस्त्यावर घडली.

accident jpg webp

याबाबत सविस्तरअसे की, एरंडोल कडून धरणगाव कडे भरधाव जाणाऱ्या (आर जे ११ जे ९३३५ )क्रमांकाच्या ट्रक ने एम पी१२ एच डब्ल्यू ८८२९ क्रमांकाची डिलक्स दुचाकी मध्य प्रदेशाची असून ती एरंडोल कडे येत होती. या दुचाकीने मृत व्यक्तीसह त्याचे जखमी झालेले तिघं साथीदार प्रवास करीत होते. दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील भोला (वय २२, राहणार नागपूर) हा इसम जागेवरच गतप्राण झाला तर त्याचे साथीदार अजय कुमार चव्हाण (वय २०) लोकेश सोळंकी (वय ३०) राम जीवन चव्हाण (वय ४२) हे तिघे जण गंभीर जखमी झाले. डॉक्टर कैलास पाटील यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना नंतर जळगाव येथे हलविण्यात आले.

Advertisements

दरम्यान ही दुर्घटना झाल्यानंतर ट्रक धरणगाव कडे सुसाट वेगाने नेण्यात आला मात्र रेल्वे पुलावर पोलिसांनी ट्रक चालकाला ट्रकसह पकडले . ट्रक एरंडोल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now