⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | रावेरात तलवार हल्ल्यात एकाचा मृत्यू

रावेरात तलवार हल्ल्यात एकाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महिलेला अपशब्द शब्द बोलण्याची बाब 55 वर्षीय इसमाच्या जीवावर आल्याचा प्रत्यय रावेरात आला. 55 वर्षीय इसमाने महिलेला अपशब्द उच्चारल्यानंतर महिलेच्या मुलाने तलवार हल्ला केल्याने 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी रावेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. दरम्यान, तलवार हल्ल्यात राजू देवराम चौधरी (55, रा.संभाजी नगर, रावेर) यांचा मृत्यू ओढवला तर पोलिसांनी या प्रकरणी संशयीत आरोपी रवींद्र संतोष मराठे (रा.संभाजी नगर) याला अटक केली असून तलवारही जप्त करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

तलवार हल्ल्यात एकाचा मृत्यू

सूत्रांच्या माहितीनुसार, राजू देवराम चौधरी ( 55 , रा.संभाजी नगर रावेर) यांनी पुष्पाबाई संतोष मराठे यांनी अपशब्द शब्द बोलण्याच्या कारणावरून पुष्पाबाई यांचा मुलगा तथा संशयीत आरोपी आरोपी  ररवींद्र संतोष मराठे (रा.संभाजी नगर) याने संतापाच्या भरात तलवारीने राजू देवराम चौधरी यांच्यावर तलवारीने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जळगावच्या न्यू कलश रुग्णालयात हलवले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू ओढवला.

ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. राजू देवराम चौधरी यांचा भाऊ गणेश देवराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात संशयीत आरोपी रवींद्र संतोष मराठे याच्या विरोधात गुरनं.182 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.