गुन्हे

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । मित्राचा वाढदिवस साजरा करून घराकडे परतत असलेल्या तिघा मित्रांना वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. तर दोघं जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ डाॅ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशाल उर्फ विकी रमेश रंधे (वय-२५), रोहित दगडू इंगळे (वय-२५) व उदय भगवान बोदळे (वय-२३, तिघेही रा. सिद्धार्थनगर, नशिराबाद) हे तिघे जण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस साजरा करून हे तिघेही मित्र त्यांची दुचाकी (क्र. एम.एच.१९. डी.एस.८६९२) ने सुनसगाव रोड, बालाजी लाॅन्सकडून नशिराबादला परत येत होते.

यावेळी जळगावकडून सुनसगावकडे जाणाऱ्या भरधाव डंपर (क्र. एम.एच.१९, झेड. ४७४८) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात विशाल रंधे याचा जागीच मृत्यू झाला. तर रोहित इंगळे याच्या डोक्याला गंभीर मार लागला. उदय बोदडे याला देखील दुखापत झालेलीच असून दोघांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button