जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२१ । शिरसोली रोडवरील जैन इरिगेशन कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कार शिकत असताना कार तलावात जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. जावेद अलियार खाॅ पठाण असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून हा घातपात असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.
याबाबत असे की, जावेद अलियार खाॅ पठाण हे शिरसोली रोडवरील जैन इरिगेशन कंपनीत फिटर पदावर कायमस्वरूपी नोकरीत होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता जावेद हे कैलास राठोड याच्यासह कंपनीची चारचाकी शिकत होते. सुमारे दोन-तीन किलाेमीटर अंतर कापल्यानंतर घाटात ब्रेकऐवजी त्यांनी एक्सलेटर दाबले. यामुळे चारचाकी वेगाने घाटातून पुढे जाऊन तलावात कोसळली.
या वेळी कैलास राठोड कसेबसे बचावले; पण जावेद यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सायंकाळी साडेसात वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला.
दरम्यान, जावेद अलियार खाॅ पठाण हे चारचाकी वाहन शिकण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याकडून ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबले गेल्याने त्यांचा अपघात झाला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या शिवाय अन्य कोणतेही कारण नाही, असे कंपनीच्या वतीने अधिकारी अनिल जोशी व डी. आर. पाटील यांनी कळवले आहे.
हे देखील वाचा :
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- वाल्मिक कराडवर अखेर मकोका; कोर्टात नेमकं काय झालं?
- मध्यमवर्गीयांसाठी ‘या’ आहेत पाच परफेक्ट कार; किंमतही बजेटच्या बाहेर जाणार नाही!
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल