गुन्हेजळगाव जिल्हा

घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रौढासोबत रस्त्यातच घडलं विपरीत, जळगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२४ । जळगावात अपघाताच्या घटना काही थांबताना दिसत नसून अशातच आणखी एका अपघाताची घटना समोर आलीय. दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना १३ जुलै रोजी रात्री घडली. निलेश केशव बारी (आबंटकर) वय ४४, मूळ रा. शिरसोली, ह. मु. शास्त्रीनगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

याबाबत असे की, निलेश केशव बारी हे शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते सागरपार्ककडून घराकडे जात असतांना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीतून (एमएच १६, बीवाय ७५५५) क्रमांकाची कार यावेळी अचानक समोर आल्याने दुचाकीस्वार निलेश बारी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते कारवर आदळले.

हा अपघात इतका जोरदार होता की, दुचाकीस्वार हे थेट कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलेश बारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या शरिरातून रक्तस्त्राव सुरु होता. ते रक्ताच्या थारोळ्यात सुमारे अर्धा तासापर्यंत पडलेले होते. यावेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या एका तरुणाने जखमी बारी यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी तपासणी करत मयत घोषीत केले.

यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. दरम्यान, रामानंदनगर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती देण्यात आली आहे. तेथे घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अपघात झाल्यानंतर दुचाकी धडकलेल्या कारचालक रुग्णालयात दाखल झाले. त्या कारमधील नागरिक हे अहमदनगर येथील असून ते जळगावात आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी आले होते. त्याठिकाणी जात असतांना हा अपघात झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button