⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापसाच्या भावात झाली वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 5 मार्च 2024 । कापसाला अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निरशा जनक वातावरण असून अनेकांनी काडीमोल दरात कापूस विकला. कापसाचा हंगाम संपूर्ण बरेच दिवस झाले तरी अद्यापही दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. मात्र अशातच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंज (आय.ई.एस.) मध्ये वाढलेले सेंटचे दर १०३ वरून ९४ वर आल्यामुळे भारताच्या खंडीचे कमी झालेले दर पुन्हा वाढले आहेत. तर अमेरिकेचे कमी झाले आहेत. यामुळे निर्यातीची जी शक्यता निर्माण झाली होती ती पुन्हा मावळली असल्याने कापसाचे भाव वाढण्याची शक्यता कमी झाली आहे.काही प्रमाणात कापसाचे दर वाढले असले तरी जिल्ह्यातील जिनिंगमध्ये कापसाची आवक पूर्णपणे मंदावली आहे.

कापसाचे सध्याचे दर ७ हजार ३०० ते ७ हजार ४०० रुपयांवर आहेत. जे दर फेब्रुवारी महिन्यात ६ हजार ७०० ते ६ हजार ८०० वर होते. ते दर ३०० ते ४०० रुपयांना जास्त आहे. मात्र ज्या प्रमाणात आवक जिनिंगमध्ये पाहिजे होती त्याप्रमाणात ती दिसून येत नाहीय सध्यातरी हंगाम संपला अशीच स्थिती कॉटन बाजारात दिसतेय. निर्यातीला पोषक वातावरण नसल्याचा फटक् कापसाला बसत आहे.

दरम्यान खान्देशात एकूण उत्पादनापैकी ७० टक्के कापसाची विक्री झाली असून, आता शेतकऱ्यांकडून अजून ३० टक्के कापूस शिल्लक आहे. कापसाला अजून चांगला दर मिळेल या आशेने अजूनही अनेक शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणताना दिसून येत नाहीत.