जळगाव लाईव्ह न्युज । ११ एप्रिल २०२२ येथील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन चार वर्ष पूर्ण झाले तरी देखील परिस्थिती पाहता अजून वर्षभर या पुलाचे काम पूर्ण होईल की नाही असे चित्र आहे. करोडो रुपये खर्च करून होणाऱ्या फुलाविषयी सर्वत्र नाराजी पसरली आहे सर्व लोकप्रतिनिधी विकास कामे व्हावी म्हणून वेळोवेळी प्रयत्न करतात निधी आणतात परंतु सरकारी अधिकारी ठेकेदार यांच्या नाकर्तेपणामुळे विकास कामे मार्गी लागत नाही यामुळे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल महावीर जिनिंग जवळ सदर आंदोलनाचे आयोजन सकाळी १० ते ४ या वेळेत करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विलंबाचे नेमके कारण काय आहे शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही. वारंवार मुदत वाढवावी लागते, किती दिवसात काम पूर्ण होईल, याचा लेखी खुलासा देण्यात यावा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा आयुक्त जळगाव व संबंधित उड्डाणपुलाचे ठेकेदार यांचे पैकी कोणाची इच्छा आहे की सदर पुलाचे काम व्हायला नको आणि व्हायला पाहिजे तर त्यांचे व्यतिरिक्त कोणाकडे अधिकार आहेत जेणेकरून उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल याचा लेखी खुलासा देण्यात यावा, लाख रुपये पगार घ्यायचा सरकारी अधिकाऱ्यांनी करोडो रुपये पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि बदनामी घ्यायची लोकप्रतिनिधींनी हा कुठला न्याय आहे याचाही खुलासा द्यावा, रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासंबंधी ठेकेदारांनी खुलासा करावा की त्यांनी कुठल्या लोकप्रतिनिधीला कमिशन दिले, कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला लाच दिली, जेणेकरून बदनामी थांबेल दोन तीन वेळा मुदतवाढ देऊन देखील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही याविषयी काय कारवाई केली याचा देखील लेखी खुलासा देण्यात यावा, यासह अन्य मागण्याचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
सदर निवेदनावर नगरसेवक अँड.दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, भारती शिंदे, प्रिया जोहरे, विजय राठोड, पृथ्वीराज मोरे, नीलेश इंगळे, योगेश चौधरी, नवल सपकाळे, उमाकांत वाणी, भगवान धनगर, अशोक सोनवणे, दिलीप मोरे, बापू महाजन, श्रीकांत पाटील यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.