⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

दुर्दैवी! पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच पतीनेही उचललं धक्कादायक पाऊल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२३ । अपघातात जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच विरहात पतीने थेट धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.राजू सोनसिंग राठोड (वय ३०, रा. बोदर्डी, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?
२९ सप्टेंबरला जळगाव-भुसावळदरम्यान भादली रेल्वेस्थानकाजवळ तीसवर्षीय तरुणाचा रेल्वेखाली येऊ मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करून जिल्हा शासकीय रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. नशिराबाद पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. कपड्यात मिळालेल्या कागदावरून त्याचे नाव राजू सोनसिंग राठोड असे असल्याचे निष्पन्न झाले.

राजू राठोड याच्या मृत्यूचे कारण समोर येताच पोलिसही थबकले. तीन दिवसांपूर्वीच संगीता राठोड यांच्या मृत्यूप्रकरणी याच नशिराबाद पोलिसांत झीरो नंबरने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असताना पती राजू राठोड यांच्या मृत्यूचीही तशीच नोंद करण्यात आली. पोलिस नाईक अतुल महाजन तपास करीत आहेत.

दरम्यान, राजू व संगीता राठोड हे पती-पत्नी दुचाकीने जात असताना रावेरजवळ अपघात होऊन पत्नी संगीता जखमी झाली. तातडीने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना संगीताचा मृत्यू झाला.पत्नी विरहात राजू यानेही आपली जीवनयात्रा संपविली