⁠ 
रविवार, मे 5, 2024

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक किडनी दिनानिमीत्त रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात जागतिक किडनी दिनानिमीत्त रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या रॅलीचा प्रारंभ डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या प्रवेशव्दारावरील फित कापून माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पडीत, फिजिशियन डॉ. चद्रया कांते,डॉ. सी डी सारंग, नेफ्रोलॉजीस्ट डॉ. अभय जोशी, डॉ सुयोग तन्नीरवार,रूग्णालय प्रशासन अधिकारी एन जी चौधरी,डायलेसिस तंत्रज्ञ रवि बोरसे यांच्या सह मेडिसिन विभागचे सर्व डॉक्टर उपस्थीत होते.कडनी आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवापैकी एक मानला जातो.

१४ मार्च हा दिवस किडनी आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. किडनीचे आरोग्य राखणे आपली जबाबदारी आहे. किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच आपल्या तंदुरुस्त आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी सतत कार्यरत असते. शरीरातील एक प्रकारची ही गाळणी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आणि ब्लड प्रेशर सुरळीत राखण्याची जबाबदारी आपल्या दोन्ही किडन्यांवर असते यामूळे किडनीच्या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

तर डॉ. अभय जोशी यांनी किडनीचे आरोग्य सर्वासाठी ही थीम घेवून यावेळेस जागतिक किडनी दिवस साजरा केला जात आहे असे प्रास्ताविकात सांगितले. यानंतर डायलेसिस विभागात रक्त शुध्दीकरणासाठी आलेल्या रूग्णांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. डायलेसिस विभागाची सजावट आर्कषक फुग्यांनी करण्यात आली. रॅलीचे आयोजन डॉ. विशाल चव्हाण,डॉ.विनय बुराडकर, डॉ उमेश, डॉ. तेजस, डॉ परितोष यांनी केले यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.