जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । तुषार देशमुख । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाळीसगावच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवजयंती सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे लक्ष्मीनारायण जोडप्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीला ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये अभिषेक संपन्न झाला. ब्राह्मणवृंदांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन चाळीसगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे सिग्नल पॉईंट येथे सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये सर्व महिला पुरुषांनी भगव्या रंगाचे फेटे परिधान केले होते. छत्रपतींच्या जयघोषाने चौक दणाणून गेला होता.
या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी घाट चाळीसगाव येथील शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मनसेचे तालुका अध्यक्ष संग्राम सिंग शिंदे व शहराध्यक्ष अण्णा विसपुते यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म वेळ सायंकाळी 6: 27 मिनिटांनी असल्यामुळे महाराजांचा जन्म वेळेचा मुहूर्त साधून प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने आपल्या घरातील दरवाजासमोर एक दिवा शिवरायांच्या नावाने लावून समाजाला एक अनोखा संदेश दिला.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह शिंदे, शहराध्यक्ष अण्णाभाऊ विसपुते, शहर उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, तालुका उपाध्यक्ष विलास राठोड, शहर उपाध्यक्ष पंकज स्वार, प्रसिद्धीप्रमुख दीपक पवार, कल्पेश सुतार, गणेश चौधरी, वझरे प्रवीण, शहर उपाध्यक्ष जितेन्द्र देसले, वाहतूक शहराध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, नरेंद्र राठोड, बंटी पाटील. नितीन वाडेकर, तुषार देशमुख, गणेश चौधरी मनसे छायाचित्रकार लोकेश राजपूत, ललित राजपूत, नवीन राहुल निकम, योगेश पाटील, संदीप देशमुख, हरीश पाटील, यशवंत चव्हाण, रस्ता आस्थापन विभाग तालुका अध्यक्ष भाईदास बोरसे, विद्यार्थी सेना अध्यक्ष कल्पेश सुतार, पियुष शिंदे, देवेंद्र शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चाळीसगाव शहरासह तालुक्यातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.