जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । महाशिवरात्री निमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र चांगदेव मंदिरात डॉ. केतकी पाटील यांनी पती डॉक्टर वैभव पाटील यांच्या समवेत महाभिषेक केला. महा अभिषेकानंतर चांगदेव महाराजांचे दर्शन घेतले.

यानंतर जवळील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरात देखील दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. यावेळीपुजारी हरिभक्त पारायण विष्णु महाराज गुरव पुजारी, आकाश महाराज गुरव पुजारी, ऍड राजेंद्र पाटील मलकापूर, मिलिंद भाऊ डवले मलकापूर यांच्यासह महिला भाविक, चांगदेव गावातील युवा वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यात. दिंडीतील भाविकांची देखील संवाद साधून दिंडीची माहिती चांगदेव येथील यात्रेची परंपरा जाणून घेतली.