⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाला नमन, महिला दिनी नारीशक्तीला वंदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डॉ. केतकी पाटील यांची विविध कार्यक्रमांना उपस्थिती

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन हा एकाच दिवशी आल्याने महिला वर्गाचा आनंद द्विगुणीत झाला. देवाधिदेव महादेव यांना नमन करण्यासाठी आज पहाटेच श्री क्षेत्र चांगदेव येथे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील यांनी जाऊन मनोभावे पूजा केली. याप्रसंगी उपस्थित महिला भाविकांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि संवाद साधला.

महाशिवरात्री उत्सवानिमित्त आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या पहिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी ताई पाटील ह्यांनी चांगदेव येथे जाऊन महादेवाला अभिषेक केला. त्या नंतर भुसावळ येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या वतीने आयोजित महाशिवरात्री उत्सवास उपस्थित दिली, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आले. तद्नंतर पुराणात उल्लेख असलेल्या तापी तीरावरील श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात मनोभावे अभिषेक केला. तेथे सागर कोळी या रांगोळी कलाकाराने शंकर पार्वती यांची सुंदर आकर्षक रांगोळी काढली होती, त्याच्या कलेचे कौतुक डॉ केतकी ताई यांनी केले. पहाटेपासून रात्री उशिरा पर्यंत अध्यात्मिक कार्यक्रमात डॉ केतकी ताई पाटील यांनी सहभागी होऊन भाविक भक्तांशी संवाद साधला. याप्रसंगी भाविकांना देखील मनमोकळेपणाने हितगुज केले तसेच महिलांनी सह युवा वर्गाने सेल्फी घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.

चांगदेव तीर्थक्षेत्रावर महा अभिषेक
मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र चांगदेव मंदिरात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी त्यांचे पती डॉ वैभव पाटील यांच्या समवेत महाभिषेक केला. महा अभिषेकानंतर चांगदेव महाराजांचे दर्शन घेतले. यानंतर जवळील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराचेही दर्शन घेतले. यावेळी पुजारी हरिभक्त पारायण विष्णु महाराज गुरव पुजारी, आकाश महाराज गुरव पुजारी, ऍड राजेंद्र पाटील मलकापूर, मिलिंद भाऊ डवले मलकापूर यांच्यासह महिला भाविक, चांगदेव गावातील युवा वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी डॉ केतकी पाटील यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन दिंडीतील भाविकांशी संवाद साधला.

वारकऱ्यांसमवेत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रार्थना
मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरते तसेच पंचक्रोशी सह दूरवरून भाविक भक्त दिंड्या घेऊन येथे दर्शन घेतात. हे वारकरी परिसरातील विविध मंदिरांमध्ये निवास करतात, आज चांगदेव येथील श्री ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रुक्माई मंदिरात वारकऱ्यांसोबत सहभागी होऊन डॉ केतकी ताई यांनी प्रार्थना केली. यावेळी ह भ प सुखदेव महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज अध्यक्ष, ह भ प तुळशीराम महाराज आळंदीकर, ह भ प संजयसिंग महाराज राजपूत अध्यक्ष टेंबे संस्था, ह भ प सुदाम महाराज बोरसे चांगदेव, ह भ प रामकृष्ण महाराज पाटील नंदुरबार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

महिला या शिव शक्तीचे प्रतीक – डॉ केतकी पाटील
देवाधिदेव महादेवाची महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिवस असा संगम जुळून आला आहे. यानिमित्त भुसावळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील, महानुभाव पंथांचे प्रभाकर शास्त्रीजी, हंसराज शास्त्रीजी, स्वामीनारायण पंथाचे सचिव ऋषिप्रसाद शास्त्रीजी, हिंदू -मुस्लिम एकता मंचाचे हाजी शब्बीर शेख, अखिल भारतीय जैन संघाचे माजी अध्यक्ष प्रेमभाऊ कोटेचा, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या भुसावळ केंद्राच्या संचालिका बी के सिंधू दीदी, दिपनगर औष्णिक वीज प्रकल्पाचे अभियंता रवींद्र सोनकुसरे होते. या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती सर्वाधिक होती. याप्रसंगी युवतींनी सांस्कृतिक कला सादर केल्या.

यावेळी महिला ही शिव शक्तीचे प्रतीक आहे. महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत संयम ठेवत सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या तर कुटुंबाला चांगले संस्कार त्या देऊ शकतात. जगात केवळ प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय हे एकमेव अध्यात्मिक केंद्र असे आहे की ज्याच्या प्रमुख पदाधिकारी आणि केंद्र चालवणारे महिलाच आहेत असे प्रतिपादन डॉ केतकी पाटील यांनी करून महिला दिनाच्या व महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ज्योती दीदी, अनिल भाई, नाना भाई, कुकरेजा भाई आणि ओम शांती परिवारातील शेकडो सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पुराणात उल्लेख असलेल्या तापी तीरावरील श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात मनोभावे अभिषेक
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील ह्यांनी आज भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे महाशिवरात्रीनिमित्त तापी नदीच्या तीरावरील श्री कपिलेश्वर महादेवाचा अभिषेक केला. पुराणात कंडारी येथील कपिलेश्वर महादेवाचा उल्लेख आहे. या जागृत देवस्थानात विविध धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. तसेच विविध पूजा देखील येथे होतात. श्री कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीच्या पावन दिनी शिवलिंगाचा मनोभावे अभिषेक केला. यानंतर मंदिराचा इतिहास जाणून घेतला. तसेच मंदिर परिसरात शंकर-पार्वती ची सुंदर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली. रांगोळी कलाकार सागर यांच्या कलेचे कौतुक ही केले. याप्रसंगी कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मुरलीधर जेठवे, भाजपा भुसावळ तालुका सरचिटणीस (कंडारी) दिलीप कोळी, पुरोहित अनिल दीक्षित यांच्यासह विश्वस्त,महिला वर्ग आणि युवा बहुसंख्येने उपस्थित होते.