⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

उन्हाचा पार सलग चाैथ्या दिवशी ४४ अंशांवर

जळगाव लाईव्ह न्यूज । ९एप्रिल २०२२। जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून घाेंगावणारे अवकाळी पावसाचे ढग निवळले असून शुक्रवारी वातावरण केवळ ५ टक्के एवढेच ढगाळ हाेते. सलग चाैथ्या दिवशी तापमान ४४ अंशांच्या उच्चांकावर असल्याने उष्णतेची लाट तीव्र स्वरूपाची आहे.

येत्या पाच दिवसांत उत्तर महाराष्ट्रासह लगतच्या विदर्भ, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या प्रदेशांत उष्णतेची लाट तीव्र राहील. विदर्भ आणि जळगाव जिल्ह्यात पारा ४४ अंशांपुढे आहे. उत्तरेतील राज्यांतून वाहणाऱ्या ताशी १७ किमी वेगाच्या काेरड्या उष्ण वाऱ्यामुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र आहे. शुक्रवारी जळगावचे कमाल तापमान ४४ तर किमान तापमान २५ अंशांवर पोहचले हाेते.