बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोकाट गुरांमुळे आरटीओच्या वाहनाला अडथळा!

जुलै 22, 2022 12:21 PM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर यावल बस स्टॅन्ड समोर गुरढोरांच्या कळपांमुळे चक्क आरटीओच्या वाहनाला अडथळा निर्माण झाला. दरम्यान, शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या निष्क्रिय कामकाजामुळे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाच म्हणजे आरटीओलाही महामार्गावर अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

yawal 27

20जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आरटीओ अधिकाऱ्याचे वाहन फैजपूरकडून यावल बस स्टॅन्ड कडे येत असताना यावल एसटी स्टँड समोरच गुरढोरांचा मोठा कळप भर रस्त्यावर म्हणजे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर यावल नगरपालिका हद्दीत उभा असल्याने आरटीओ वाहनालाच मोठा अडथळा निर्माण झाला. हे प्रत्यक्ष दर्शनी बघितल्याने आरटीओच्या आणि यावल नगरपालिकेच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

महामार्गावर किंवा इतर रस्त्यावर आरटीओचे वाहन दुरून पाहता बरोबर इतर वाहनधारकांची तारांबळ उडत असते. काही अवैध प्रवासी वाहनधारक आणि इतर काही जण वाहतूक करणारे वाहन लांब अंतरावरच थांबून जातात. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर आरटीओ ज्याप्रमाणे कारवाई करतात त्याप्रमाणे सर्व ठिकाणी ठराविक वेळेला भर रस्त्यावर जे गुरढोर/ गाई म्हशी असे प्राणी चालत असतात. किंवा थांबलेले असतात त्यावेळेला प्रत्येक वाहनधारक म्हणतात रस्त्यात आरटीओ उभे आहेत. दरम्यान, अशा अनधिकृत गुराढोरांवर आरटीओ काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी आरटीओ किंवा संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी गुरढोरं मालकांना किंवा ढोरकऱ्यांना आधी सूचना देण्याची, कायदेशीर कार्यवाही, दंडात्मक कारवाई करावी असे सुद्धा आता बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now