---Advertisement---
वाणिज्य

काय सांगता! 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा पुन्हा बदलून मिळणार? काय आहे सत्य? घ्या जाणून

---Advertisement---

गेल्या सहा वर्षांपूर्वी मोदी सरकारने देशातील चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद केल्या होत्या. तुमच्या घरी अजूनही या जुन्या नोटा आहेत का? जर होय, तर जाणून घेऊया सरकार काय बोलले आहे.

iit indore 1 jpg webp webp

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याबाबत आहे. व्हायरल झालेल्या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की आरबीआयने विदेशी नागरिकांना भारतीय नोटा बदलून देण्याची सुविधा आणखी वाढवली आहे.

---Advertisement---

या पोस्टची चौकशी केली असता, गांभीर्य पाहून, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी फॅक्ट चेक) च्या फॅक्ट चेक टीमने या प्रकरणाची चौकशी केली आणि सत्य समोर आणले. पीआयबीने या व्हायरल पोस्टची सत्यता तपासली आहे. PIB फॅक्ट चेकने म्हटले आहे की, विदेशी नागरिकांसाठी 500-1000 च्या जुन्या नोटा बदलण्याची सुविधा वाढवण्याचा दावा खोटा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दाव्याबद्दल ट्विट करत ते म्हणाले की परदेशी नागरिकांना भारतीय नोटाबंदीच्या नोटा बदलून देण्याची सुविधा 2017 मध्ये संपली आहे. 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्याबाबत असा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---