जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच भरधाव ट्रेकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शिरपूर अंकलेश्वर महामार्गावरील चोपडा तालुक्यातील अडावद येथील पेट्रोल पंप परिसरात घडली आहे.

यावल तालुक्यातील उसमळी पाडा येथील गजाबाई सोनारिंग बारेला असे अपघातात मृत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. उमाळी येथे वास्तव्यास असलेला सुभाष चोटीराम बारेला (वय २०) हा तरूण १५ जूनला अडावद गावाकडून चोपडा येथे जाण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत आजी गजाबाई बारेला आणि आजोबा सोनारसिंग पिदा बारेला हे देखील होते. दुचाकीने तिघेजण चोपडा येथे जात होते.
दरम्यान अडावद गावाजवळील पंपाजवळ पेट्रोल भरण्यासाठी सुभाष बारेला याने दुचाकी हळू केली. यावेळी पेट्रोल पंपावर वळण घेण्याच्या तयारीत असतांना त्याला ट्रकने जोरदार (Accident) धडक दिली. या धडकेत गजाबाई बारेला या वृध्द महिला फेकल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष बारेला आणि त्याचे आजोबा सोनारसिंग बारेला हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.