धक्कादायक ! चाळीसगावच्या तितूर नदीत ४४ वर्षीय प्रौढाने घेतली उडी, शोधमोहीम सुरु

सप्टेंबर 30, 2025 1:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२५ । अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक नाले, नद्यांना पूर आला असून याच चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीत गोविंदा पवार (वय ४४) या वर्षीय प्रौढाने उडी घेतली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

titur river chls

दरम्यान घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून बोटीच्या साह्याने संपूर्ण नदी पात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र संबंधित इसम मिळून आला नाही. गोविंदा पवार या व्यक्तीने तितूर नदीपात्रात नेमकी कशासाठी उडी घेतली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून मात्र या घटनेमुळे नदीकाठी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी गोविंदा पवार यांच्या पत्नीचा आक्रोश पाहायला मिळाला.

दरम्यान, भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नदीपात्रातील शोधकार्याची पाहणी केली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. खासदार वाघ यांनी कुटुंबाला धीर दिला. प्रशासनाने ही शोधमोहीम पुढील दिवसही सुरू ठेवावी आणि संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now