मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

बस आणि दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, एक गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२३ । बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. निंबा भिवसन कोळी ( रा.गुढे ता,भडगाव) असं अपघातातील मृताचे नाव असून ही घटना भडगाव तालुक्यातील कजगाव येथील पारोळा चौफुलीवर घडली.

नेमकी घटना काय?
निंबा कोळी व प्रसाद रवींद्र चौधरी (वय १६ वर्ष रा. पिलखोड ता, चाळीसगांव) हे दोघे दुचाकी (एम. एच.१९ ऐ.एफ.३१२८) ने गोंडगावकडून कजगावकडे येत होता. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीची आणि पुणे-एरंडोल या एसटी बस (एम.एच .२० बी.एल.२६५२)ची जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले होते त्यांना ग्रामस्थ व नातेवाईकांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर अपघातातील तरुणाची ही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे पारोळा चौफुलीवर झालेल्या जोरदार अपघातामुळे काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. तर अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले.