जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । कालच जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव शहरात ३ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केलाय. त्यानंतर लागलीच चार महिन्यांपासून स्थीर असलेल्या तेलाच्या दरात अचानक वाढ झाली आहे.
साेयाबीन तेलाच्या दरात प्रतिकिलाे चार रुपये तर सनफ्लाॅवर तेलाच्या दरात ६ रुपयांची वाढ कंपन्यांतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, शेंगदाणा तेलाच्या दारात मात्र वाढ झाली नाहीये. गेल्याच वर्षी लाॅकडाऊनच्या काळात तेलाच्या दरात माेठी वाढ झाली हाेती. ती दिवाळीपर्यंत कायम राहिली हाेती.
साेयाबीन तेलाचे दर प्रति १५ किलाेचे २४५० रुपये हाेते. अर्थात, साेयाबिन तेल १८०० वरुन २०६० झाले हाेते. तर सूर्यफुलाचे तेल २१०० रुपयांवरुन २५०० रुपयांवर गेले हाेते. हे दर ८ मार्चपर्यंत कायम हाेते. काल जिल्ह्याधिकाऱ्यांनी ३ दिवसांत जनता कर्फ्यू लागू करताच साेयाबीन तेल १५ किलाे २०६० रुपयांवरुन २१२० रुपये तर सूर्यफुल १५ किलाे २५५० रुपयांवरुन २६५० रुपये झाले आहे.