---Advertisement---
कोरोना जळगाव जिल्हा

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्या ‘शून्य’

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । जिल्हा प्रशासनाकडून रविवारी जाहीर करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारीत आज जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनी एकही रुग्ण आढळून आला नसल्याने हा नागरिकांसाठी सुखद धक्का आहे.

corona

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यानंतर मृत्यूदर देशात सर्वाधिक होता. मध्यंतरी रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पुन्हा कमी झाली. शासनाने निर्बंध वाढू लागताच रुग्णसंख्या पुन्हा वाढली. जानेवारीच्या अखेरीस तर दररोज १०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते.

---Advertisement---

रविवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत शून्य रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सध्या ६८ रुग्ण उपचार घेत असून आज १४ रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहे. जिल्ह्यासाठी आज सुखावह दिवस असला तरी नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---