⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | बातम्या | भाजपातील दोन नव्हे अनेक आमदार माझ्या संपर्कात : खडसेंचा गौप्यस्फोट

भाजपातील दोन नव्हे अनेक आमदार माझ्या संपर्कात : खडसेंचा गौप्यस्फोट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | १९ जून २०२२ | भारतीय जनता पक्षातले दोनच आमदार नव्हे तर कित्येक आमदार माझ्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट एकनाथराव खडसे यांनी केला. यावेळी ते म्हणले कि,यावेळी ते म्हणाले कि, भाजपा आमदार आणि माझं वैयक्तिक नातं आहे. वैयक्तिक संबंध आहेत. मात्र पक्षविरोधी भूमिका घेऊन ते मला मतदान करतील असं मला वाटत नाही. अशी स्पष्ट भूमिका एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

विरार येथे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा करण्यासाठी एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी गेले होतो. ही चर्चा तब्बल एक तास चालली. या चर्चेत राजकीय विषय केवळ एकदा आला. इतर वेळी आम्ही वैयक्तिक विषयावर चर्चा केली. असे खडसे म्हणाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे यांनी आपले मत व्यक्त केले की, हितेंद्र ठाकूर आणि माझे संबंध गेल्या 32 वर्षांपासूनचे आहेत. राजकारणापलीकडे आमचे संबंध आहेत. मात्र ऐन निवडणुकीवेळी ते कोणाला मतदान करतील हे मी त्यांना सांगू शकत नाही. त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्या प्रकारे ते मतदान करतील.

यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजपाचे दोन आमदार तुम्हाला मतदान करणार असं म्हटलं जात आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ? असा प्रश्न विचारला. यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये माझ्या संपर्कात असलेले कित्येक आमदार आहेत. या आमदारांना आमदार बनवण्यासाठी त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले होते. यामुळे त्यांचा आणि माझा संपर्क नेहमी येत असतो. कित्येक आमदारांना माझ्यामुळे मंत्रिपद मिळाले असल्यामुळे ते आमदार माझ्याशी संपर्कात असतात. मात्र ते पक्षविरोधी भूमिका घेतील असं मला वाटत नाही. याच बरोबर भारतीय जनता पक्ष हा केवळ एकनाथराव खडसे यांच्या विरोधात प्रचार करत नसून तो महाविकासआघाडी विरुद्ध प्रचार करतोय मात्र याच्या मध्ये विजय महाविकास आघाडीचा होईल असेही यावेळी खडसे म्हणाले

author avatar
टीम जळगाव लाईव्ह