जळगाव लाईव्ह न्युज | २२ एप्रिल २०२२ | कोरोना काळात आपण कित्येक लोकांना गमावलं त्यातलं एक सर्वात मोठं नाव म्हणजे हरिभाऊ जावळे. हरिभाऊंनी भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्यात रुजवण्यासाठी मोठे कष्ट घेतले अशा शब्दात नितीन गडकरी यांनी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची आठवण काढली.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी शुक्रवारी जळगाव जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधला. यासाठी जळगाव शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यकर्त्यांशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष मोठ्या कष्टाने मोठा झाला आहे. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी कित्येक बड्या नेत्यांनी कष्ट घेतले आहेत. आज जे नेते झाले आहेत ते कार्यकर्त्यांमुळे झाले आहेत. त्यातला एक मोठ नाव म्हणजे माजी खासदार हरिभाऊ जावळे. जेव्हा जेव्हा जळगाव जिल्ह्यात येतो तेव्हा तेव्हा मला हरिभाऊची आठवण येते. कारण त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी खूप कष्ट सोसले आहेत आणि याच कष्टातुन भाजपा मोठी झाली आहे.