---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

.. तर आजची सकाळ खराब झाली नसती, नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टिका

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । राज्यात अनेक मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आज शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर सडकून टिका केलीय. Nitesh Rane criticizes Sanjay Raut

nitesh rane sanjay raut jpg webp

दिवाळीच्या वेळी एक साबणाची जाहिरात यायची उठा उठा मोती स्नान करण्याची वेळ आली. उठा उठा आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या बाजूला जेवणाची वेळ आली. कोणाला कुठे झुकाव लागत हे आता संजय राऊत यांना कळेल. आजची ईडी (ED) चौकशी ही त्यांनी अंगावर ओढून घेतलेली आहे. तिन्ही वेळा जर चौकशीला सामोरे गेले असते तर आजची सकाळ त्यांची खराब आणि आमची चांगली झाली नसती.

---Advertisement---

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, शिंदे गटातील आमदार आज निश्चित समाधानी असणार. कारण जे जे शिवसेनेवर प्रेम करतात.जे जे बाळासाहेबांचे निष्ठावान सैनिक आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे शिवसेना संपवायला हा संजय राऊत मुख्य कारणीभूत आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व हे पवार साहेबांच्या पायाखाली नेऊन ठेवलं, शिवसेना सारखा जुना पक्ष संपवण्याचा प्रयत्न यांनी केला. ठाकरे कुटुंबियाला जे काय आज दिवस दाखवले त्याचा प्रमुख जबाबदार हा संजय राऊत आहे. त्या संजय राऊतवर कारवाई होत असेल, अटक होत असेल तर प्रत्येक शिवसैनिक हा निश्चितपणे समाधानी होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---