⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | बातम्या | निलेश राणेंची राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा ; कारणही केलं स्पष्ट..

निलेश राणेंची राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा ; कारणही केलं स्पष्ट..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२३ । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेण्याचं कारणही नीलेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

निलेश राणे यांची पोस्ट
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19 ते 20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.

‘BJPमध्ये खूप प्रेम मिळालं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन.’

‘निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!’

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.