⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | महत्वाची बातमी : नियमावली जाहीर , राज्यात रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

महत्वाची बातमी : नियमावली जाहीर , राज्यात रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जानेवारी २०२२ । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. जाणून घ्या नवीन नियमावली..

राज्यात काय-काय सुरु राहणार?
राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
पहिल्या लाटेमध्ये सलून चालकांचं आणि कामगारांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता 50 टक्के क्षमतेनं सलून चालविण्याची मुभा
खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
हॉटेल रेस्टॉरंट रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
शॉपिंग मॉल ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास परवानगी

राज्यात काय काय बंद राहणार?
खेळाची मैदानं, उद्यानं, बागा, बंद
राज्यातील सगळी पर्यटन स्थळ टोटली बंद राहणार
स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णत: बंद राहणार
एंटरटेन्मेंट पार्क, प्राणीसंग्रहालये, संग्रहालये, गडकिल्ले पुढील आदेशापर्यंत बंद
शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी काय नियमावली?
लग्नाचं शुभकार्य फक्त ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याची परवानगी
अंत्यसंस्कारावेळी २० लोकांना उपस्थित राहण्यास मुभा
सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी

हे राहणार सुरु मात्र नियम पाळून :
– दिवसा ५ पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही.
– रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
– ५० टक्के क्षमतेनं नाट्यगृह, सिनेमागृह सुरू राहणार
– राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद, दिवसा ५० टक्के क्षमतेने सुरू रहणार.
– बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक
– हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
– हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार
– विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
– सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
– अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल

हे राहणार बंद :
– स्विमिंग पूल, जिम, स्पॉ, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून बंद

– मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– इंटरटेन्मेंट पार्क, प्राणी संग्रालय, वस्तूसंग्रालय, पर्यटक ठिकाणी कार्यक्रम बंद

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.