जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली जळगाव ते तळई रातराणी बस अखेर सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ही बस जळगाव येथे रात्री ८.३० वाजता येते तर जळगाव येथून रात्री ९ वाजता तळईसाठी सुटते. सकाळी तळई येथून सकाळी ८ वाजता निघून १० वाजेपर्यंत जळगावला पाेहाेचते.
गेल्या अनेक दिवसांपासून संपावर असलेले कर्मचारी आता कामावर हजर हाेवू लागल्याने अनेक बस फेऱ्या सुरु हाेत अाहेत. यात एरंडोल आगाराची तळई ते रातराणी बस १७ तारखेपासून सुरू केल्याची माहिती आगारपं्रमुख विजय पाटील यांनी दिली. विभागीय वाहतूक निरीक्षक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनात एरंडोल आगाराचे आगार प्रमुख विजय पाटील, वाहतूक निरीक्षक गोविंदा बागुल यांनी प्रवाशांची अनेक दिवसांपासून होत असलेली मागणी अखेर पूर्ण केली आहे. या रातराणी बसने जिल्ह्यातील अनेक प्रवाशी प्रवास करतात. जळगाव येथून रात्री ९ वाजता सुटणारी ही एकमेव बस असल्याने विद्यार्थी, व्यापारी, खरेदीसाठी अालेले नागरिक, नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची माेठी गर्दी असते.