⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

जळगाव मनपा इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची उभारणी करावी, निधी फाउंडेशनची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहर मनपा इमारतीमध्ये हिरकणी कक्ष नसल्याची बाब गेल्या आठवड्यात निधी फाउंडेशनने केलेल्या पाहणीत समोर आले होते. निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी याविषयी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

राज्य सरकारने प्रत्येक महत्त्वाचे शासकीय कार्यालय, बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि वर्दळीच्या कार्यालयात स्तनदा मातांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. निधी फाउंडेशनतर्फे गेल्या आठवड्यात पाहणी करण्यात आली असता मनपा इमारतीमध्ये हिरकणी कक्षच उभारण्यात आला नसल्याचे लक्षात आले होते.

जळगाव शहर मनपामध्ये दररोज घरपट्टी, जन्म – मृत्यू दाखला आणि इतर कामानिमित्त कितीतरी महिला येत असतात. मनपा इमारतीमध्ये तब्बल १७ मजले असून एखाद्या मजल्यावर लवकरात लवकर हिरकणी कक्षाची उभारणी करावी, अशी विनंती निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी निवेदनाद्वारे महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे.