शनिवार, सप्टेंबर 16, 2023

जळगाव मनपातील ‘त्या’ २७ नगरसेवकांवरील अपात्रतेच्या कारवाईबाबत मोठी बातमी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२३ । जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या २७ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विभागीय आयुक्तांकडे सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?
जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या ५७ नगरसेवकापैकी तब्बल २७ नगरसेवकांनी बाहेर पडून महापौर निवडणुकीवेळी पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे उल्लघंन केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी विभागीय आयुक्ताकडे याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी विभागीय आयुक्तांकडे पूर्ण होवून त्यावर निकाल लागणार होता. मात्र महापौर जयश्री महाजन यांनी या याचिकेच्या सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती. ती मागणी झाली असून सुनावणीला स्थगिती आली होती.