⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव शहरातील आजचा पाणीपुरवठा बंद ; उद्या ‘या’ भागात होणार पाणीपुरवठा

जळगाव शहरातील आजचा पाणीपुरवठा बंद ; उद्या ‘या’ भागात होणार पाणीपुरवठा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरवासियांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक मोठी बातमी आहे. आजचा म्हणजेच ५ ऑगस्ट रोजीचा पाणीपुरवठा बंद राहणार असून पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

मनपाने जारी केलेल्या सूचनेनुसार महानगरपालिका पाणी पुरवठा अमृत योजना ८०० मीमी व्यासाची पिप्राळा मुख्य जलवाहीनी जोडणी गिरणा पंपींग रोड येथे दि.०५/०८/२०२३ रोजी करण्यात येत असल्याने दि.०५/०८/२०२३ रोजी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

त्यामुळे जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यांत येत असून दि.०५/०८/२०२३ रोजीचा होणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा दि.०६/०८/२०२३ रोजी करण्यांत येईल.तसेच दि.०६/०८/२०२३ रोजी व ०७/०८/२०२३ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि. ०७/०८/२०२३ व ०८/०८/२०२३ रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या या भागात होणार पाणीपुरवठा :
शनिपेठ, बळीराम पेठ, नवीपेठ, शाहूनगर, प्रतापनगर, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, भोईटेनगर, सिंधी कॉलनी परिसर, जोशीपेठ, गणेशवाडी, सुप्रिम कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, शिवरामनगर, यशवंतनगर, हरिविठ्ठलनगर, नंदनवन कॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रध्दा कॉलनी, प्रभात कॉलनी, चर्च रोड, या भागात रविवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.