जळगावकरांसाठी गुडन्यूज ! पुण्याला जाण्यासाठी नवीन ट्रेन सुरु

ऑगस्ट 4, 2025 2:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातून दररोज हजारो प्रवासी पुणे येथे ये-जा करत असतात. जळगाव रेल्वे स्थानकावरून पुण्यासाठी मोजक्याच गाड्या धावत असून यामुळे अनेकदा कन्फॉर्म तिकीट मिळत नसते. यामुळे प्रवाशांना दुसरा पर्याय म्हणून एसटी तसेच खासगी बसेसने प्रवास करावा लागतो. जळगाव येथून पुण्याला थेट विमानसेवा सुरु असून अवघ्या काही तासात पुण्यात पोहोचणे शक्य आहे. मात्र त्याचे रेल्वे, बससेवेपेक्षा विमानाचे तिकीट दर जास्त असल्याने ते सर्वसामान्यांना आवाक्याबाहेरचे ठरत आहेत.

train

त्यातच आता सणासुदीचे दिवस सुरु होणार आहे. सणासुदीच्या काळात रेल्वेसह बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. यामुळे गर्दीच्या हंगामात बऱ्याचवेळा जागा मिळत नाही. अशा या परिस्थितीत भुसावळ-पुणे दरम्यान सुरू करण्यात आलेली हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांसाठी खूपच सोयीची ठरली होती. मात्र, मध्य रेल्वेच्या प्रशासनाने ती गाडी भुसावळऐवजी थेट अमरावतीहून सोडण्याचा निर्णय घेतला.

इतर बऱ्याच लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या जळगावमार्गे पुणे जात असल्या, तरी त्यांना जळगाव स्थानकावर थांबा नाही. प्रवाशांसमोर त्यामुळे एसटी किंवा खासगी निमआराम बसने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. असे असताना, मध्य प्रदेशातील रेवा ते हडपसर (पुणे) दरम्यान सुरू झालेल्या नवीन साप्ताहिक रेल्वे गाडीमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळू शकणार आहे.

जळगावमार्गे नव्याने सुरू झालेली रेल्वे गाडी प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने २०१५२ रेवा-हडपसर (पुणे) साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दर बुधवारी सकाळी ०६:४५ वाजता रेवा स्थानकावरून सुटेल आणि गुरुवारी सकाळी ०९:४५ वाजता सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नैनपूर, बालाघाट, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौड कॉर्ड लाईन मार्गे हडपसर येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात २०१५१ हडपसर- रेवा साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडी दर गुरुवारी पुणे स्थानकावरून दुपारी ०३:१५ वाजता सुटेल आणि शुक्रवारी दुपारी ०५:३० वाजता रेवा येथे पोहोचेल. या साप्ताहिक गाडीत एकूण २० एलएचबी डबे असतील. ज्यामध्ये चार द्वितीय श्रेणी आसनी, तीन तृतीय श्रेणी एसी, तीन तृतीय श्रेणी एसी इकॉनॉमी, दोन द्वितीय श्रेणी एसी आणि उर्वरित शयनयान प्रकारातील डबे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now