---Advertisement---
महाराष्ट्र शैक्षणिक

MPSC च्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! परीक्षांसंदर्भातील नवे नियम २०२५ पासून लागू होणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२३ । MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे MPSC परीक्षांसंदर्भातील नवे नियम २०२५ पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

mpsc jpg webp webp

यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता , त्या जागी 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं. अलका टॉकीज चौकात या एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. दरम्यान यावर सरकारतर्फे सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

---Advertisement---

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---