जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आले असून खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाकडून राज्यभर लेव्हल ३ चे निर्बंध जारी करण्यात येणार आहेत. राज्य शासनाकडून याबाबतचे संकेत मिळाले असून शहरातील सर्व आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. २७ जून पासून सदर नियमावली लागू होईल.
कोव्हिड-19 ची साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी विविध आदेशांद्वारे राज्यात निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्र राज्याचा कोविड-19 चा धोका कायम असल्याने तसेच 4 जून 2021 च्या आदेशानुसार डेल्टा, डेल्टा प्लस या कोविडच्या नव्या व्हेरिएंट्सचा प्रसार होत असून लवकरच (4 ते 6 आठवडे) मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर अधिक घातक रूपात कोविडची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत.
यात जळगाव जिल्हा हा तिसर्या लेव्हलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. यामुळे या लेव्हलसाठी असणारे निर्बंध आपल्या जिल्ह्यासही लागू राहतील हे स्पष्ट आहे. याबाबत जिल्हा प्रशासन स्थानिक पातळीवरून निर्देश जारी केले आहेत.
जळगाव जिल्ह्यात काय सुरु काय बंद राहणार?
-अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 4 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील.
-हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 4 पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार, रविवार बंद राहील.
– मॉर्निंगवॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल.
आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील.
-50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील.
-स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 4 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.
-लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल.
– बांधकाम दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
-शेतीविषयक सर्व कामे करता येतील.
-ई कॉमर्स दुपारी 4 पर्यंत सुरु असेल.
-जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.
अपडेट : जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत.