जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । जिल्हा काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारणी मे अखेर जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी प्रसिद्दी पत्रिकाद्वारे कळविले.
तसेच महाराष्ट्र् प्रदेश काँग्रेस कमिटीने जाहीर केलेले विविध ४१ सेलचे जिल्ह्याध्यक्ष देखील नेमले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रथमच तृत्तीयपंथी ( किन्नर ) यांच्यासाठी जिल्हास्तरावर स्वातंत्र्य सेलची निर्मिती केली जाणर असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील असणार असल्याचे देखील कळविले आहे.
नुकतीच मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष पोटले यांच्या उपस्थित बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यात अल्पसंख्यांक, अ.जा.विभाग, भटक्या विमुक्त जाती, शिक्षक, डॉक्टर, विधी व सहकार, औद्योगिक, मच्चीमार, उद्योग वाणिज्य तसेच विविध सेल जिल्हास्तरावर स्थापन केले जाणार आहे.