जळगाव जिल्हा

संभाजी ब्रिगेड बिजनेस कॉन्फरन्सशी ‘नवी दिशा नवा विचार’..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । संभाजी ब्रिगेडची २० वी बिझनेस कॉन्फरन्सशी रविवार, १८ सप्टेंबर रोजी मुंबई येथील जगप्रसिद्ध हॉटेल द अँबेसेडर मध्ये पार पडली. यावेळी प्रविण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘ नवी दिशा नवा विचार’ स्वीकारत Seeing is Believing – बघा आणि विश्वास ठेवा हा विचार पेरण्यात आला. या कॉन्फरन्ससाठी जळगाव जिल्ह्यातून निवडक २० लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.

बिझनेस कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शन करत असताना प्रविण गायकवाड यांनी तरुणांना उद्योग व्यवसाया सोबतच बदलत्या काळाची पावले ओळखून जगभरात उपलब्ध होणाऱ्या संधींची व आज पर्यंत ” अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूख आपला ” या संकल्पनेतून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ८५०० युवकांना परदेशात नोकरी – व्यवसाय व शिक्षणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली.

तसेच प्रविण गायकवाड ( प्रदेशाअध्यक्ष – संभाजी ब्रिगेड ) , श्याम पाटील ( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ) , तुषार सावंत ( जळगाव जिल्हाध्यक्ष ) यांच्या प्रमुख उपस्थितीत किरण नानासाहेब सूर्यवंशी यांची संभाजी ब्रिगेड – अमळनेर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर भोसले ( मुबंई प्रदेशाध्यक्ष ) , श्याम कदम ( दक्षिण मुबंई – जिल्हाध्यक्ष ) , प्रतिक सकपाळ ( ईशान्य मुबंई – जिल्हाध्यक्ष ) , स्वप्निल भोसले ( दक्षिण मुबंई कार्याध्यक्ष ) यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button