---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

मंत्री तुम्ही तुमच्या घरी, हे.. भर सभागृहात निलम गोऱ्हेंनी गुलाबरावांना झापलं

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । राज्याच्या पावसाची अधिवेशनाचा आज गुरुवारी दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. यादरम्यान, आज शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा शब्दांत झापलंय. छातीवर हात ठेवून कसलं बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

gulabrao patil nilam gorhe jpg webp

म्हणून डॉ. गोऱ्हे गुलाबराव पाटलांवर संतापल्या :
शिक्षकांच्या बाबतीतील एका प्रश्नावरुन गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गदारोळादरम्यान मंत्री गुलाबराव यांना वारंवार खाली बसण्याची विनंती करत होत्या. गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? परत परत सभापती सांगतायत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही? असा त्या म्हणाल्या.

---Advertisement---

यानंतर गुलाबराव पाटील यांनी मी मंत्री आहे! यावर डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे. दरेकरजी काय चाललंय? हे  अहो शांत राहा, असेही त्या म्हणाल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---