लसींची मागणी जास्त पुरवठा कमी , नागरिकांमध्ये रोष
जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जुलै २०२१ । लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत असताना लस तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीये. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची अक्षरश: लस पुरवताना दमछाक होत आहे. परिणामी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची माहिती ज्येष्ठ नागरिकांना भरता येत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये गर्दी करत आहेत. या प्रकारामुळे लसीकरणापेक्षाही नागरिकांचा रोष आणि रजिस्ट्रेशनचा गोंधळ यामध्ये कर्मचाऱ्यांचे अक्षरश: हाल होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. शासनाकडून लसींचा पुरवठा अत्यंत कमी येत आहे. लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असताना लस कमी असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांची अक्षरश: दमछाक होत आहे.
नागरिकांचा आणि कर्मचाऱ्यांचा झाला वाद
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन कसे करावे याची माहिती नाही. यामुळे या नागरिकांना त्रास सहन करवा लागत आहे. याच बरोबर नागरिक आरोग्य केंद्रावर जाऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लसींचा पुरवढा इतका कमी का आहे ? असा प्रश्न विचारात विचारात असतात व त्यांना धारेवर धरत असतात. याचा त्रास कर्मचाऱ्यांना होत असतो व बऱ्याचदा आरोग्य कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी
कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांची कोरोना लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी करत आहेत. नागरिक सकाळ पासून रांगेत उभे राहतात तरीही नागरिकांना लस न मिळात नाही. तर काहींना वशिलेबाजी करून लस मिळत असते. यामुळे रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांकडून राग व्यक्त होत आहे.तरी आरोग्य केंद्रावरील चालणारी वशिलेबाजी बंद करून रांगेत उभे असलेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य दिले जावे व शासनाने लसीचा पुरवठा वाढवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.