⁠ 
रविवार, मे 19, 2024

चेनपुलिंग करणाऱ्या भामट्यांकडून रेल्वेने वसुल केले तब्बल ‘इतके’ लाख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । रेल्वेतील अनअधिकृत फेरीवाल्यांसाठी चैन पुलींग करणाऱ्या भामट्यांकडून एकाच महिन्यात रेल्वेने तब्बल तीन लाखांचा दंड वसूल केला आहे. याच बरोबर रेल्वेने अनधिकृत दलालांकडून अवैध तिकीटावर प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई केली आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने मे महिन्यात भुसावळ विभागात फुकटे प्रवासी, बोगस तिकीटावरील प्रवासी, अनअधिकृत वेंडरर्स, मद्य व तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती.

गुन्हे दाखल करून भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये अनधिकृत अलार्म चैन ओढण्याची ९४१ प्रकरणांची नोंद करण्यात आली. ७११ व्यक्तींना अटक करण्यात आली आणि २ लाख ७१ हजार २०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

इतरांना गैरसोय होण्याच्या अनावश्यक कारणांसाठी विनाकारण साखळी ओढू नका असे आवाहन रेल्वेने केले आहे. अनधिकृत एजंट, दलालांकडून तिकिटे खरेदी करू नका. अनधिकृत फेरीवाल्यांना प्रोत्साहन देऊ नका. ट्रेनमध्ये दारू, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाऊ नका. योग्य तिकीट मिळवा आणि सन्मानाने प्रवास करा.