---Advertisement---
जळगाव जिल्हा प्रशासन यावल

यावल पंचायत समितीला राष्ट्रवादीचे निवेदन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरातील खड़काईचा पूल गेल्या ८ ते १० वर्षांपासून बांधलेला असून, अद्यापही पुलाचे संरक्षण कठडे बसवले नाही. ते लवकर बसवण्यात यावे तसेच रस्त्यालगत असलेले काटेरी झाडे झुडपे काढण्यात यावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंचायत समितीच्या लिपिकांना निवेदनाद्वारे केली आहे.

panchayt nivedan jpg webp

सविस्तर असे की, यावल शहरातील खड़काई नदीच्या लगत डॉ.जाकिर हुसेन शाळेच्या खड़काईचा पुल गेल्या ८ ते १० वर्षांपासून बांधलेला आहे.अद्याप सदर पुलाचा आजु -बाजूने संरक्षणसाठी कठडे बसवलेले नाही. यामुळे मोठी जिवित हाणी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी शासकीय आयटी आय व डॉ. जाकिर हुसेन कॉलेज, जे.टी महाजन इंग्लीश मिडिअम शाळा आहे. त्यात लगत रस्त्यांवर रोज वाहनाचा रात्री बेरात्री मोठी वर्दड असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या काही अपघात अप्रिय घटना घडू नये यासाठी या पुलावर नविन कठडे बसवण्यात यावे, तसेच जे.टी महाजन शाळा शासकीय विश्रामगृहा पर्यंत रस्त्यांचे कडेला दोन्ही आजू बाजूने वाढलेली काटेरी, झाडे झुडफ्यांनमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन व शाळेतील विद्यार्थ्याना त्रास सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर पुलाचे संरक्षण कठडे बसवणे त्यात रस्त्यावर लगत काटेरी झाडे झुडपे काढण्यात यावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष आरिफ खान, अय्युब खान व कॉंग्रेसचे कार्यकर्ता विक्कि गजरे यांनी यावल पंचायत समितीचे लिपिक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

---Advertisement---

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---