राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला २० जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. अश्यावेळी राष्ट्रवादी हा दिवस गद्दारी दिवस म्हणून पाळणार आहे. या दिवशी राष्ट्रवादी तर्फे राज्यभरात निदर्शने करण्यात येणार आहेत.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी २० जून २०२२ रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर रात्रीच आपली वेगळी चूल मांडत सूरतला निघुन गेले होते. दोन दिवसानंतर २० जून रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गद्दारी दिवस साजरा करणार असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
खोक्यांचे राजकारण करून धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी ‘गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के’ ही घोषणा राज्याच्या कानाकोपर्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा निषेध व्यक्त करावा. शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. या दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात येणार आहे