जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौक व तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन घेण्यात आले. यावेळी संपूर्ण मुक्ताईनगर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी – जय शिवाजी’ ‘निषेध असो -निषेध असो.. वाचाळवीर राज्यपालाचा निषेध असो…’ , ‘ कोश्यारी गो बॅक’ अशा घोषणा देत राज्यपाल कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते त्रिवेदी यांचा निषेध करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यपाल महोदयांकडून शिवरायांचा अवमानास्पद उल्लेख झाल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील अशीच मुक्ताफळे उधळली. हे सातत्याने जाणिवपूर्वक होत आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येत आहे. आम्हा मराठी माणसांसाठी शिवराय म्हणजे दैवत आहेत. त्यांचा अवमानास्पद उल्लेख आम्ही मराठी माणूस कदापि सहन करणार नाही. एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे.
“आज हुतात्मा दिवस आहे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत ज्या हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्याच हुतात्म्यांच्या स्मृतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी म्हणून आंदोलन करण्याची वेळ येते, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, शिंदे – फडणवीस सरकारला असा महाराष्ट्र अभिप्रेत आहे का…? ,हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर एकत्र येत सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय नाहीत का…?, देवेंद्र फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल उच्चारलेले अपशब्द कसे सहन होतात…?” , असे सवाल यावेळी ऍड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी राज्य सरकारला विचारले.
“महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे राज्याचे राज्यपाल यांना राज्याची संस्कृती, राज्यातील थोर महापुरुष यांच्या बद्दल एक आपुलकी आस्था व प्रेम असायचे दुर्दैवाने भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्र द्वेष असल्याचे जाणवते किंबहुना त्यांना महाराष्ट्रात पाठवून राज्यातील महापुरुषांबद्दल वारंवार अपमानास्पद वक्तव्य करूवून घेणे, राज्याची सांस्कृतिक अस्मिता बिघडवणे हीच मुळात भाजप व भाजपची मातृसंस्था असणाऱ्या संघाची रणनीती असून वेळप्रसंगी राज्याच्या राज्यपालांना राज्याच्या संस्कृतीचा परिपाठ देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भविष्यात नक्की करेन” असा इशारा यावेळी दिला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,तालुका अध्यक्ष यु डी पाटील,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे, नंदकिशोर हिरोळे,रामभाऊ पाटील,विजय पाटील,विशाल रोठे,मुन्ना बोडे, रईस पटेल,रउफ खान,शाहिद खान,जुबेर अली, आसिफ पेंटर, फिरोज सय्यद, मुश्ताक मण्यार, सलीम मिस्त्री, अनिस पटेल, अय्याज पटेल, हाशम शाह, वहाब खान, हारून कुरेशी, इरफान खान, आबीद शे मजिद, कौसर अली,शेख वसीम काझी,फारुख खान,राफीख खान,आसिफ खान,नाजीम खान,सकीर सय्यद,इस्माईल मणियार,शेख सोनू, अन्नू पेंटर, शोएब खान,अरबाज खान,जावेद शाह, , चेतन राजपूत,रजाक मुलतानी,योगेश पाटील, रितेश पाटील, मयुर पाटील,अजय आढायके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते