महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संभाजीनगर नामांतराला विरोध ; राजीनामे देणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ मार्च २०२३ | काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने औरंगाबादच्या नामांतराला परवानगी दिली. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले. मात्र आता या मुद्द्यावरून औरंगाबादचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

एमआयएमकडून नामांतराला विरोध होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यामध्ये उडी घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नामांतराला विरोध केला असून, त्यांनी याविरोधात सामूहिक राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराच्या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी सहमती दिली आणि त्यानंतर शहराचे नामांतर करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले असा आमचा विश्वास आहे. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे अशी आमची भावना होती, त्यामुळे आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात काम करत होतो. परंतु नामांतरास समर्थन दिल्यामुळे आमची ही भावना संपली आहे व आमच्यासोबत पक्ष न्याय करू शकत नाही असा आरोप पदाधिकाऱ्यांचा आहे

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नामांतराला परवानगी दिल्यानं आम्ही छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १० पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील ४० पदाधिकारी अशा एकूण ५० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याची भूमिका घेतल्याचं या पदाधिकाऱ्यानी म्हटलं आहे. यामुळे नामंतराचा हो मुद्दा आता राष्ट्रवादीची डोकेदुखी

Related Articles

Back to top button