जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तृत आढावा बैठक दि. ७रविवारी रोजी मुक्ताईनगर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे व प्रमुख पाहुणे म्हणून सरचिटणीस जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील हे होते. यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती गट गणाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणीचा आढावा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक आढावा, जिल्हा परिषद गट गण प्रमुख नेमणूक करणे, बूथ रचना, राष्ट्रवादी युवक युवती काँग्रेस संघटनात्मक आढावा यासह इतर संघटनात्मक बाबीचा आढावा घेण्यात आला.
मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील यांनी सभासद नोंदणी कार्यक्रम विषयी माहिती दिली. तसेच बुथ रचनेचा आढावा घेतला. जिल्हा परिषद गट प्रमाणे : हरताळे रुईखेडा गटाचा ईश्व रहाणे, अंतुर्ली- कर्की गटाचा विनोद तराळ, कुऱ्हा वढोदा गटाचा डॉ.बी.सी महाजन, निमखेडी उचंदा गटाचा बाळा सोनवणे, एन.जी शेजाळे, बोदवड तालुक्यातील शेलवड साळशिंगी गटाचा रामदास पाटील, नाडगाव मनुर गटाचा मधुकर राणे, रावेर तालुक्याचा वाय.डी.पाटील यांनी संघटनात्मक लेखाजोखा मांडला.
यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे -खेवलकर, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, रमेश पाटील, प्रा डॉ.सुनील नेवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु.डी.पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना कांडेलकर, युवक तालुका अध्यक्ष राजेश ढोले, सामाजिक न्याय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा पाटील, शहराध्यक्ष राजु माळी, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर , विलास धायडे , विकास पाटील, प्रदिप साळुंखे, किशोर गायकवाड, किशोर चौधरी, जि.प.सदस्य निलेश पाटील, रामदास पाटील, मधुकर राणे, कैलास चौधरी, राम पाटील, जगदीश बढे, निलेश पाटील, सतिष पाटील, बी.सी. महाजन, चंद्रकांत बढे, गणेश पाटील, सुनील कोंडे, भरत पाटील, रवींद्र दांडगे, सुनील काटे, हकीम शेख, गोपाळ गगतिरे, अनिल वराडे, अनिल पाटील, प्रमोद धामोळे, निलेश पाटील, सुधीर तराळ, बाळा भाल शंकर, सतिष पाटील, प्रदीप बडगुजर, शेख जफर, हकीम बागवान, लताताई सावकारे, निताताई पाटील, प्राजक्ता चौधरी ,पंकज येवले, मिनाक्षी ताई कोल्हे, विजया जावळे, बापू ससाणे, प्रविण पाटील, शे शकील, मस्तान कुरेशी, एजाज खान, विजय चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.