⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गिरीश महाजनांनी तर दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले, खडसेंच्या गंभीर आरोप

गिरीश महाजनांनी तर दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले, खडसेंच्या गंभीर आरोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । दाऊदशी संबंधांच्या मुद्द्यावरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ekanth Khadse) यांनी कडक शब्दांत फटकारले आहे. खडसे यांनी भाजपमधील नेते गिरीश महाजन याच्यावर गंभीर आरोप केला आहे. “भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिर्ची हा दहशतवादीच होता. गिरीश महाजन यांनी तर नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले होते,” असा आरोप खडसे यांनी केला आहे. जळगावातील निवासस्थानी खडसे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना भाजपवर निशाणा साधला.

जळगावातील निवासस्थानी खडसे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना भाजपवर निशाणा साधला. ‘भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिर्ची कोण आहे? तो तर दहशतवादी आहे. दाऊदच्या नातेवाईकांसोबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकत्र बसून जेवण केलं होतं. मग त्यांचाही दाऊदच्या नातेवाईकांशी संबंध आहे असं म्हणायचं का?,’ असा सवाल खडसे यांनी केला.

‘भाजपची या संदर्भामध्ये दुटप्पी भूमिका आहे. दाऊदशी व्यवहार झाला किंवा दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला म्हणून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर ठेवलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत असं मलिक यांचं म्हणणं आहे. शिवाय अजून ते सिद्ध झालेले नाहीत. एकीकडे भाजपचे नेते दहशतवाद्यांशी संबंध ठेवतात. इक्बाल मिर्चीसारख्या लोकांकडून पक्षासाठी देणग्या घेतात हे काय आहे? ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळं नवाब मलिक हे भाजपला चुकीचे वाटत असतील तर भाजपनंही काही गोष्टींवर खुलासा केला पाहिजे, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.