---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला सरकारला पाठिंबा – अजित पवार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून येत्या काळात राज्याचा विकास व्हावा यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ajit pawar jpg webp

आमच्यावर कोण काय प्रतिक्रिया देत आहे. याचा आम्हाला फरक पडत नाही. आम्ही विकसासाठी सरकार सोबत आहोत. आम्हाला कामाचा मतलब आहे. असे यावेळी अजित पवार म्हणाले

---Advertisement---

तर दुसरीकडे छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, आम्ही सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत. ओबीसींचा प्रश्न असो की इतर समाजाचा आम्ही एकत्र येऊन सोडणार आहोत. आमच्यावर कोणताही प्रकारच्या केसेस नाही. कोणताही दबाव आमच्यावर नाही. आम्ही आलो आहोत तो महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी.

आमच्याकडे सर्व आमदारांचा पाठिंबा असून देशहितासाठी राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही राष्ट्रवादी आणि घड्याळ या पक्षाचं नाव आणि चिन्ह यावरच निवडणुका लढवणार आहोत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---