---Advertisement---
जळगाव जिल्हा

जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे ‘एक काॅल मदतीचा : संवाद आपुलकीचा’

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । जिल्ह्यातील नागरिकांसाठी त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या साेडवण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक काॅल मदतीचा : संवाद आपुलकीचा’ हे अभियान हाती घेतले आहे. त्याचा शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले.

rastrvadi jpg webp

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे रवींद्र पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश आदिक, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित हाेते.

---Advertisement---

असे असेल अभियान

सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते ५ वाजेदरम्यान नागरिकांना ७७५७०७४९८० किंवा ०२५८२ २९९७७३ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्यानंतर या अभियानात काम करणारे स्वयंसेवक या समस्यांसंदर्भात संबंधित विभागांशी संपर्क साधून ते काम पूर्ण करण्यासाठी अथवा समस्या निराकरणासाठी मदत व सहकार्य करतील. समस्या मार्गी लागण्यापर्यंत हा पाठपुरावा सुरू राहणार आहे. त्यामुळे हे अभियान फलदायी ठरणार आहे.

‘एक काॅल मदतीचा : संवाद आपुलकीचा’ अभियानाचा शुभारंभ करताना खासदार शरद पवार, साेबत मंत्री जयंत पाटील, राेहिणी खडसे आदी.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---