जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२३ । राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसलाय. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक (Navab Malik)यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, नवाब मलिक हे वर्षभरापासुन अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी नव्हते. तसेच त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही अजित पवार गटात जाणार की शरद पवारांना साथ देणार याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती.
दरम्यान, आज विधानभवनात दाखल होताच मलिक यांची माजी गृहमंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्यासोबत भेट झाली. एकमेकांच्या समोर आल्यावर या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. यानंतर ते सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले.
त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. असे असलं तरीही मलिक यांनी अधिकृत भूमिका मात्र अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे जेवढी चर्चा अधिवेशनाची सुरु आहे, तेवढीच चर्चा नवाब मलिक यांच्या भूमिकेची देखील आहे.