जळगाव शहर
नवरात्री उत्सव : प्रभाग क्र-१७ मध्ये स्वच्छता अभियान!
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशनानुसार 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबवले जात आहे. त्यानुषंगाने तसेच नवरात्री उत्सव पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्र-१७ मध्ये पारंपरिक मंदिराचा परिसर स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कामगार यांच्या वतीने स्वच्छ करण्यात आले.
शहरातील जुन्यागावतील मरीमाता मंदिर,विठ्ठल मंदिर,कलिंकामाता, मंदिर अयोध्या नगर येथील मनुदेवी मंदिर,हनुमान मंदिर,गणपती मंदिर श्री दत्त मंदिर,शांती निकेतन येथील दुर्गा उत्सव मंडळ,हनुमान मंदिर,राम मंदिर, हनुमान मंदिर परिसर या ठिकाणी स्वच्छता अभियान करून देवीचा जागर केला. या स्वच्छता अभियानासाठी नगरसेवक डॉ. विरण खडके यांच्यासह इतर नगरसेवकांचे देखील सहकार्य लाभले.